गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पती उद्यानात नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे वनपाल श्री. सुभाष नाचणकर, महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते.
यावेळी श्री. नाचणकर यांनी वृक्ष महोत्सवाचे महत्त्व तसेच वृक्षारोपणाबद्दलची शास्त्रीय माहिती दिली. तसेच डॉ. गोरे यांनीही विद्यार्थांना वनीकरणाविषयी माहिती दिली.
राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि वानास्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी या वृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेतला. बेहडा, रिंगी, सोनचाफा, करंज, पेरू, स्पॅथोडीया, पेल्टोकोरम, चिंच, गूळभेंडी, नीव या पानास्पती प्रजातींची लागवड यावेळी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. मंगल पटवर्धन, प्रा. शरद आपटे, डॉ. सोनाली कदम आणि विद्यार्थी उपस्थित होते.