अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजेतील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड सप्ताहाच्यानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. हा उपक्रम भगवती किल्ला बाग येथील आवारात केला. यावेळी सुरु, बहावा, निलगिरी अशा वृक्षांची लागवड केली.
या प्रसंगी रत्नागिरी नगर परिषेदेचे नगराध्यक्ष श्री. राहुलजी पंडित व नगरसेविका श्रीम. रशिदा गोदड व त्यांचे सहकारी पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थीदशेमद्धे विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची जबाबदारी कळावी आणि वृक्ष लागवडीची आणि वृक्ष संवर्धनाचीवृत्ती जोपासण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच श्री. सुधीर रिसबूड यांनी रत्नदुर्ग किल्ल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. विशाखा सकपाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. मकरंद दामले, प्रा. निनाद तेंडूलकर, प्रा. शिल्पा तारगावकर आणि प्रा. अर्पिता कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि उपप्राचार्य प्रा. अशोक पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.