gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘उडान’ महोत्सवाचे आयोजन

मुंबई विद्यापीठ मुंबई आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने उडान महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले असून दि. २३ जानेवारी २०२४ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे हा महोत्सव संपन्न होणार आहे.

या महोत्सवात रत्नागिरीतीलजिल्ह्यातील १८ महाविद्यालयांचा सहभाग होणार असून सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पथनाट्य, पोस्टर स्पर्धा, पोवाडा, वादविवाद, सृजनात्मक लेखन अशा स्पर्धा असणार आहेत.विद्यार्थांच्या कलागुणांना वाव व सामाजिक दायित्व भूमिका या महोत्सवातून साध्य व्हावी यासाठी विद्यार्थांना व्यासपीठ मिळवून देणारी संधी अशा महोत्सवातून प्राप्त होत असते. मंडणगड, दापोली, गुहागर, चिपळूण, लांजा, रत्नागिरी, खेड या तालुक्यांतून विद्यार्थी स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत.

समाज माध्यमे, निवडणूक साक्षरता, पर्यावरण शिक्षण, महिला सक्षमीकरण, अन्न वाचवा, आरोग्य, भारतीय संविधान अशा विविध विषयांवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग समन्वयक डॉ. शिवराज गोपाळे यांनी सदर माहिती दिली असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आजीवन अध्ययन विभागातील स्वयंसेवक विद्यार्थांना सदर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.