देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाचे वाड्.मय मंडळ, दिनविशेष समिती आणि कै. बाबुराव जोशी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दिनविशेष समितीतर्फे डॉ. कलाम विषयक भित्तिपत्रकांचे आयोजन करण्यात आले. वाड्.मय मंडळातर्फे ग्रंथ अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर ग्रंथालयाने डाॅ. कलाम, विज्ञान आणि स्पर्धा परीक्षाविषयक ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले. या कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थीनींनी उत्फुर्थ सहभाग घेतला. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांमधून विद्यार्थ्यांनी ग्रंथ अभिवाचन केले.
ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे आणि उपप्राचार्या विशाखा सकपाळ यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना विद्यार्थी जीवनातील वाचनाचे महत्व विषद केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाचन, श्रवण आणि लेखन ही प्रक्रिया समजावून सांगताना विद्यार्थी जीवनातच आपण हे अंगिकारल्यास निश्चीतच आपले व्यक्तिमत्व साकार होण्यास मदत होईल असे सांगितले. विद्यार्थ्यांना आपण भेटल्याची आठवण सांगताना उत्तम व्यक्ती, परिपूर्ण शिक्षक, थोर शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती अशा जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणारे डॉ. कलाम कसे महान होते ते विद्यार्थ्यांना सांगितले. आपणही मोठे होऊन त्याच्याप्रमाणे देशसेवा करावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कोविडच्या दीर्घ काळानंतर महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. विस्मया कुलकर्णी यांनी, सूत्रसंचालन प्रा. शिल्पा देसाई यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. कविता देवकुळे यांनी केले.
ग्रंथ अभिवाचन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जुई डिंगणकर आणि कु. नुपुर जोशी यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रा. चिंतामणी दामले, प्रा. अस्मिता कुलकर्णी, प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. जलील हुश्ये आणि इतर प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम कोविड-१९ बाबतच्या शासनाने निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे पालन करुन संपन्न झाला.