gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे विविध कार्यशाळांचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे ‘इनोव्हेटिव्ह एक्सपेरीमेंट इन फिजिक्स’ आणि ‘सिग्निफीकन्स ऑफ एक्सपेरीमेंट इन फिजिक्स’ या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अशा तीन विभागात घेण्यात आल्या. कनिष्ठ महाविद्यालयीन निवडक विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिंपियाडच्या धर्तीवर काही प्रयोगांचे आयोजन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकरिता भौतिकशास्त्रातील प्रयोग, प्रयोग पद्धती इ. विषयांवर सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांनी प्रयोग केल्यानंतर त्यावर चर्चासत्रही घेण्यात आले. या कार्यशाळेकरिता रत्नागिरी तालुक्यातील काही शिक्षकांनीही आपला सहभाग नोंदविला. वरिष्ठ महाविद्यालयातील आलेख काढण्याच्या पद्धती, भौतिकशाशास्त्रातील काही प्रयोग, प्रयोग पद्धती आणि त्यांचे महत्व इ. विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली.

‘होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, मुंबई’चे सायंटीक ऑफिसर शिरीष पठारे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम पहिले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि भौतिकशास्त्र विभागा प्रमुख डॉ. किशोर सुखटणकर आणि डॉ. महेश बेळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.