gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. डॉ. वि. के. बावडेकर स्मृती विज्ञान व्याख्यानमालेचे पुष्प प्रा. भास बापट यांनी गुंफले

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. डॉ. वि. के. बावडेकर स्मृती विज्ञान व्याख्यानमालेचे पुष्प प्रा. भास बापट यांनी गुंफले

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. डॉ. वि. के. बावडेकर स्मृती विज्ञान व्याख्यानमालेचे ३८वे पुष्प दि. १९ जानेवारी रोजी प्रा. भास बापट, आयसर, पुणे यांनी गुंफले. ‘आदित्य एल १- बहुआयामी सौर वेधशाळा’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद गोरे यांनी केले. प्रा. ऋतुजा गोडबोले यांनी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. डॉ. वि. के. बावडेकर यांचा परिचय करून देताना त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा. भास बापट यांनी आपल्या व्याख्यानातून अगदी सुलभ तरी रोचक पद्धतीने ‘आदित्य एल १’ या बहुआयामी सौर वेधशाळेची माहिती दिली. सूर्याचा अधिकाधिक जवळून अभ्यास करण्यासाठी या वेधशाळेचा होणारा उपयोग, त्यातील उपकरणे, त्यांचे कार्य याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. या वेधशाळेतील एक उपकरण त्यांच्या समूहाकडून बनवले गेले असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कै. डॉ. वि. के. बावडेकर सर आणि त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वनश्री तांबे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले. या कार्यक्रमाला रत्नागिरीतील अनेक विज्ञानप्रेमी नागरिक तसेच महाविद्यालयाचे आजी-माजी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.