gogate-college-autonomous-updated-logo

ग्रामीण विकास विषयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हा व सत्र न्यायालयास भेट

ग्रामीण विकास विषयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हा व सत्र न्यायालयास भेट

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील ग्रामीण विकास विषयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक कार्यासाठी दिवाणी व फौजदारी न्यायालय, रत्नागिरी येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२३ ला भेट दिली. या प्रात्यक्षिकातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाची माहिती देताना पॅनल विधीज्ञ अमित शिरगावर सर यांनी कायदा, न्यायालये, कलम, खटले, पुरावे इत्यादी विषयावर सविस्तर माहिती विविध उदाहरणांच्या आधारे विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खटले कसे चालविले जातात याचे प्रात्यक्षिक बघता आले. यानंतर माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्री. आर. एम. चौत्रे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री. निखील गजानन गोसावी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी या सर्वांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ‘कायद्याची ओळख’ अशा चार पुस्तकाचा संच भेट देण्यात आला.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला २०२३-२४ पासून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला. तसेच नवे शैक्षणिक धोरण प्रथम वर्षासाठी अंमलात आले. याला अनुसरून विद्यार्थ्याच्या स्थानिक गरजा व व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठी विविध संस्थाना प्रत्यक्ष भेटी देण्याचे प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण विकास विभागातर्फे हि भेट देण्यात आली. या प्रात्यक्षिक कार्यासाठी द्वितीय वर्षाचे २३ विद्यार्थी, सहाय्यक प्राध्यापक सौ. श्रावणी ईश्वर विभुते उपस्थित होत्या.

ग्रामीण विकास विषयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हा व सत्र न्यायालयास भेट ग्रामीण विकास विषयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हा व सत्र न्यायालयास भेट
Comments are closed.