दि. 03 जुलै 2024 रोजी “सायबर जागरूकता दिवसाचे” औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील संगणकशास्त्र आणि आयटी विभागातील 20 मुलांनी रत्नागिरी येथील सायबर पोलीस ठाणे रत्नागिरी येथे भेट दिली. मुलांनी तिथे गेल्यानंतर सायबर जगतात कोणकोणते गुन्हे आहेत त्याबद्दलची माहिती घेतली.
‘क्विक हील फाउंडेशन’,पुणे आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या मध्ये सामंजस्य करार झाला आहे, त्या कराराअंतर्गत हे सर्व विद्यार्थी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या अभियानाअंतर्गत सायबर जागरुकतेबद्दल प्रशिक्षण देणार आहेत. त्याकरिता सुरुवात म्हणून विद्यार्थी सायबर पोलिस ठाणे रत्नागिरी यांच्याकडे माहिती घेण्यासाठी गेली होती.
ह्या पूर्ण अभियानासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीसदलातर्फे पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीम. जयश्री गायकवाड यांच्या अधिपत्याखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नितीन पूरळकर, पोहवा श्री. रामचंद्र वडार, मपोहवा श्रीम. निशा केळकर, मपोहवा श्रीम. श्रिया साळवी यांनी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र आणि आयटी विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे यांनी या अभियानाला शुभेच्छा दिल्या. तसेच गणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे आणि या अभियानाचे शिक्षक प्रतिनिधी प्रा. केतन जोगळेकर यांनी हे अभियान व्यवस्थितरित्या संपन्न होण्याची ग्वाही यावेळी दिली.