gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेस भेट

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेस भेट

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेस भेट दिली.

माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. ब्रिटीश काळात इंग्रजांनी माथेरान हे शहर वसवले. त्यांनीच येथील पॉईंट्सना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती पॉईंट्सची नावे इंग्रजीत आहेत.इ.स. १८५० मध्ये ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मॅलेट यांनी या शहराचा शोध लावला. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे इतर मित्र परिवार आणि काहीइंग्रज माथेरानला आले. त्यामुळे माथेरान शहराला विशेष असा इतिहास आहे. माथेरानच्या जंगलात १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या, तसेच औषधी वनस्पतीही इथे आहेत.

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थांची अभ्याससहल माथेरान येथे आयोजित करण्यात आली होती. या अभ्यास सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेला भेट दिली. नगरपरिषदेतीलकार्यालयीन अधीक्षक श्री. राजेश रांजणे यांनी विद्यार्थ्यांना माथेरान शहराचा इतिहास, गिरीस्थान नगरपरिषदेचे कामकाज, नगरपरिषदेकडून राबविले जाणारे विविध पर्यावरणपूरकप्रकल्प इ. ची माहिती दिली. याप्रसंगी श्री. रांजणे म्हणाले, माथेरानच्या सौंदर्याचे, ताजेपणाचे रहस्य म्हणजे माथेरानमध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. त्यामुळे माथेरानचे हवामान आणि सौंदर्य हे पर्यावरण प्रदुषणापासून सुरक्षित राहिले आहे. तसेच या शहराला विशेष तालुक्याचा दर्जा असून, त्यासाठी शासनाकडून विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अधीक्षक यांची नियुक्ती करण्यात येते. सध्या श्री. दीक्षांत देशपांडे या पदाचा कार्यभार पाहत आहे.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नेरळ येथील हुतात्मा स्मारक, माथेरान शहरातील शिवसंग्रहालय, १८९७ मध्ये स्थापन करण्यात आलेले करसनदास मुळजी नगरपरिषद ग्रंथालय, माथेरान गिरीस्थान नगर परिषदेकडून चालविला जाणारा निसर्गऋण बायोगॅस प्रकल्प आदि ठिकाणी भेट दिली. या ग्रंथालयाचे विशेष म्हणजे या ग्रंथालयात विविध विषयांवरील दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध आहेत. येथील कर्मचारी कु. श्वेता सोनावणे यांनी या ग्रंथालयाची माहिती विद्यार्थ्याना दिली.

माथेरान सहलीतील मुख्य आकर्षण म्हणजे माथेरानची राणी असा गौरव असलेल्या छोटेखानी रेल्वेगाडीने केलेला प्रवास. १९०७ मध्ये आदमजी पिरभॉयनावाच्या पारशी गृहस्थाच्या प्रेरणेने ही रेल्वेगाडी सुरू झाली. या प्रवासाची मौज लुटणे हे माथेरानच्या सहलीतले एक महत्त्वाचे आकर्षण आहे. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या मिनिट्रेनच्या प्रवासाचा आनंद लुटतात. विद्यार्थांनी माथेरान ते नेरळ असा परतीचा प्रवास या गाडीने करून सहलीचा आनंद लुटला. या अभ्यास सहलीत राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील आणि २२ विद्यार्थी सहभागी झाले.

या अभ्यास सहलीच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचेमोलाचे मार्गदर्शन तर कला शाखा उपप्राचार्या प्रा.डॉ. चित्रा गोस्वामी यांचे सहकार्य लाभले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेस भेट

Comments are closed.