gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थांची कोळंबीसंवर्धन आणि प्रक्रिया उद्योगास भेट

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थांची कोळंबीसंवर्धन आणि प्रक्रियाउद्योगास भेट

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवज्ञानाने अभ्यासक्रमातील घटक भागांचे शिक्षण या उद्देशाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थांची कोळंबीसंवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, वरवडे येथे दि. २५ मार्च २०२१ रोजी क्षेत्रभेट करण्यात आली. कोविड-19 नियमांचे पालन करून या कोळंबी संवर्धनाचे अर्थशास्त्रीय अध्ययन क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्यातकोळंबी उत्पादनास असलेली मागणी आणि बाजारपेठ, स्थानिक बाजारपेठ व कोळंबी व्यवसायाचे अर्थशास्त्र, कोळंबीसंवर्धन, रोजगाराचे संधी, व्यवस्थापन पद्धती आणि अपेक्षित उत्पादन, कोळंबीसंवर्धनाची पूर्व तयारी, संवर्धनक्षम योग्य कोळंबी जातीची निवड, योग्य कोळंबी बीजाची निवड व साठवणूक, पूरक खाद्य व व्यवस्थापन, कोळंबी काढणी आणि व्यवस्थापन, कोळंबी विक्री , निर्यात, मिळणारे उत्पन्न अशा विविध विषयांची माहिती या क्षेत्र भेटी दरम्यान घेण्यात आली. फिशरिज महाविद्यालयातील शशांक शिंगटे या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याने मार्गदर्शन केले.

महाविद्यालय स्तरावर प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कलाशाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी क्षेत्रभेट नियोजनासाठी मार्गदर्शन केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे व विभागातील डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सुर्यकांत माने यांनी क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थांची कोळंबीसंवर्धन आणि प्रक्रिया उद्योगास भेट

Comments are closed.