महाविद्यालयाच्या करिअर गाईडन्स आणि प्लेसमेंट सेल, कॉम्प्युटर सायन्स विभागातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता ‘सॅप: एक जागतिक करिअर’ या विषयावर वेबिनारचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.६३ विद्यार्थ्यांनी वेबिनारमध्ये सहभाग घेतला. श्री. नितीन खाडे यांनी विद्यार्थ्यांना खूप चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रा. सनील सावले, विभाग प्रमुख प्रा. अनुजा घारपुरे यांचे सहकार्य लाभले. प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. त्याचप्रमाणे न्यू लाईन करिअर सर्व्हिसचे श्री. दामोदर पै यांनी तांत्रिक सहाय्य पुरविले.
भविष्यात अशा विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना विविध संधीची दालने उपलब्ध करून द्यावीत असा आशावाद महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.