गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील करिअर गायडन्स अॅड प्लेसमेंट सेल आणि एम.एस.एम.ई. विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संभव’ या राष्ट्रीय पातळीवरील उद्योजकता विकास अवेअरनेस कार्यक्रमाचे आयोजन (ऑनलाइन वेबीनार) महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता करण्यात आले होते. यामध्ये दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
एम.एस.एम.ई. विकास संस्थेचे असि. डायरेक्टर श्री. अभय दप्तरदार, श्री. एस. आर. खुंजारे, डेप्युटी डायरेक्टर श्रीम. भाग्यश्री साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे यशस्वी उद्योजक म्हणून सामविद इंटरनॅशनल प्रा.लि.चे डायरेक्टर श्री. मुकुंद पत्रीकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक डॉ. उमेश संकपाळ यांनी, सूत्रसंचालन डॉ. विवेक भिडे यांनी तर आभारप्रदर्शन समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी केले.
या कार्यक्रमाला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. भविष्यात महाविद्यालयात उद्योजकता विकास याकरिता इनक्युबेशन सेंटरसुद्धा सुरु केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.