gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १३ ऑगस्ट रोजी ‘विज्ञान शिक्षकांसाठी’ कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १३ व १४ ऑगस्ट २०१८ रोजी माध्यमिक शाळांतील ‘विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेकरीता रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक शाळेतील विज्ञान विषयाच्या किमान दोन शिक्षकांना पाठवावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेचे आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. रसायनशास्त्र या विषयातील संकल्पना विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या पद्धतीबद्दल तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रसायनशास्त्र विषयाचे शिक्षण अधिक प्रभावी होऊन विद्यार्थ्यांना या विषयात रुची उत्पन्न व्हावी असा या कार्यशाळेचा प्रमुख हेतू आहे.
कार्यशाळेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालय कार्यशाळेच्या आयोजनाची आणि भोजनाची व्यवस्था करत आहे. सहभागी शिक्षकांना प्रवासभत्ता दिला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मिलिंद गोरे (मोबा. ९४२२०५४२७४) आणि कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी (मोबा. ९७३००३२३०९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.