गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विज्ञान मंडळातर्फे नुकतीच ‘महावितरण अॅप’ संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर श्री. पटनी, प्रशिक्षण विभाग, पुणे; श्री. कुमावत, महावितरण, प्रशिक्षण विभाग, रत्नागिरी आणि विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते.
कार्याक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. मिलिंद गोरे यांनी केले. श्री. पटनी यांनी उर्जा क्षेत्रातील सद्यस्थिती याविषयी माहिती दिली. उर्जा साक्षरता आणि उर्जा व्यस्थापन या विषयांचा आढावा घेतला आणि उर्जा ही देशाच्या प्रगतीतीतील महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद केले. त्यांनी उर्जा क्षेत्रातील संभाव्य संकटांचा आढावा घेतला. महावितरणच्या MAEDCL अॅपचा वापर करण्याचे आवाहन केले.
श्री. कुमावत यांनी महावितरणच्या MAEDCL अॅपचे प्रात्यक्षिक दाखविले. बिल आणि तक्रारीविषयी उपयुक्तता सांगितली.
डॉ. भूषण ढाले यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला समन्वयक डॉ. मयूर देसाई, प्रा. शरद आपटे आणि विज्ञान शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.