भारतासह जगभरात कर्करोगाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे; या अनुषंगाने उपाय योजना करण्यासाठी दरवर्षी जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिन’ म्हणून साजरा केला जातो.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कर्करोगाची जाणीव-जागृती घडवून आणण्यासाठी महाविद्यालयाचा जीवशास्त्र विभाग विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. नुकतेच विभागात अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी तणावमुक्त जीवन या विषयावर एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ६० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. सदर स्पर्धेत ‘सुख पहाट’ ही एकांकिका विजेती ठरली.
‘आयुष्य जगण्यासाठी तणावाचे नियोजन आणि व्यस्थापन कसे करावे’ यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरीतील नामवंत मानसोपचार तज्ञ डॉ. शाश्वत शेरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. बदलत्या जीवनशैलीतील येणारा तणाव, त्याचा प्रतिबंध कसा करावा व नियंत्रण कसे प्राप्त करावे, याविषयी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या याचे त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी मार्गदर्शन केले तर विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे यांनी सहकार्य केले.