गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभाग नानाविध उपक्रम दरवर्षी राबवत असते. विद्यमानवर्षी वनस्पतीशास्त्र विभागामार्फत जागतिक कांदळवन दिनाचे औचित्य साधून विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी 26 जुलै हा दिवस ‘जागतिक कांदळवन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी कांदळवन परिसंस्था व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी दि. 25 जुलै 2025 रोजी रनपार येथील कांदळवन परिसंस्थेला विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्या परिसंस्थेतील कांदळवन व सहयोगी कांदळवनाच्या प्रजाती. तेथील फुलोरा यांची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवली. याच कांदळवनांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रा. शरद आपटे व वनस्पतीशास्त्र माजी विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांच्या व्याख्यानांचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. दि. 26 जुलै 2025 रोजी महाविद्यालयातील डॉ. ज. शं. केळकर सभागृहात व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. शरद आपटे यांनी रत्नागिरीतील कांदळवनांची विविधता या विषयावर मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने चीपी, मारंडी, कांदळ अशा प्रमुख कांदळ वनस्पती तसेच सागरगोटा, कडूमेहंदी, करंज अशा सहयोगी वनस्पतींची ओळख डॉ.मंगल पटवर्धन यांनी करून दिली. “मी खारफुटी” ही डॉ.पटवर्धन यांची कविता पर्यावरणातील खारफुटीची भूमिका व खारफुटीचे संवर्धन अधोरेखित करून गेली. या परिसंस्थेतील अनेक आश्चर्यकारक गोष्टी व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना व व्याख्यात्यांचे स्वागत विभाग प्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी केले. व्याख्यात्यांची ओळख डॉ. विराज चाबके यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परेश गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रियंका शिंदे-अवेरे यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
![]() |
![]() |
![]() |










Visitors Online : 2