गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी, इंडिया रत्नागिरी चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित केला गेला.
यावेळी जैवतंत्रज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी पाणथळ जमिनीबरोबरच प्लास्टिकचा वापर, शीतपेयांचा वापर, टी.बी., डेंग्यू, मेलेरीया अशा अनेक आरोग्यविषयक समस्यांना हात घालत जनजागृती करण्यात आली. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी श्रद्धास्थान असलेल्या काही भारतीय संशोधकांच्या प्रतिमा पालखीमद्धे प्रस्थापित करून सदर पालखी दिंडीच्या अग्रस्थानी ठेवण्यात आली.
याप्रसंगी श्री. घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निसर्ग आणि मानव एकाच पर्यावरणाचा भाग असतानादेखील दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. तो तणाव कमी होण्यासाठी काम करा असे आवाहन करत पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
या उपक्रमात ४०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये बायोलॉजीकल सायन्सेस, एन.सी.सी., एन.एस.एस., नेचर क्लब, मुलींचे वसतिगृह या वियार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाचे सहकार्य लाभले. तसेच संपूर्ण जनजागृती कार्यक्रम डॉ. ए. एस. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती पोटफोडे यांनी केले.