गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवामध्ये प्राथमिक फेरीत मध्ये एकूण २६ स्पर्धांपैकी २२ स्पर्धांमध्ये विजेते पद मिळवून ७१ पॉईंटसह रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण झोन दहा मध्ये निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे.
थिएटर विभाग-
एकांकिका गट-अ (मराठी) :- द्वितीय क्रमांक;
एकांकिका गट-ब (हिंदी) :- प्रथम क्रमांक;
स्कीट गट-अ(मराठी) :- प्रथम क्रमांक;
स्कीट गट-ब(हिंदी) :- द्वितीय क्रमांक;
माईम :- द्वितीय क्रमांक
वाङमय विभाग-
वक्तृत्व गट-अ(मराठी):- द्वितीय क्रमांक;
वक्तृत्व गट-ब(English):- तृतीय क्रमांक;
वादविवाद गट-अ (मराठी):- द्वितीय क्रमांक;
वादविवाद गट-ब(English):- प्रथम क्रमांक
गीतगायन-
समूहगीत गायन :- प्रथम क्रमांक;
वेस्टर्न समूहगीत गायन :- प्रथम क्रमांक;
वेस्टर्न :- प्रथम क्रमांक
शास्त्रीय गीत गायन :- प्रथम क्रमांक;
नाट्यसंगीत :- प्रथम क्रमांक;
शास्त्रीय वाद्य [तालवाद्य] एकल: तालवाद्य :- प्रथम क्रमांक;
शास्त्रीय वाद्य [नॉन-पर्क्यूशन] एकल: स्वरवाद्य :- प्रथम क्रमांक
फाईन आर्टस्-
रांगोळी :- तृतीय क्रमांक;
मेहंदी :- द्वितीय क्रमांक;
पोस्टर:- तृतीय क्रमांक;
क्ले मॉडेलिंग:- उत्तेजनार्थ
नृत्य-
लोकनृत्य :- उत्तेजनार्थ;
शास्त्रीय नृत्य :- प्रथम क्रमांक.
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम स्पर्धेसाठी वरील सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. तांत्रिक बाजू सांभाळणारे प्रा.शुभम पांचाळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
संगीत विभागासाठी दिग्दर्शक ओंकार बंडबे व प्रा. वैष्णवी जोशी नाट्य विभाग यतीन पवार, मनोज भिसे, प्रतीक हिवाळे, लोकनृत्य हेमंत कांचन यांचे मार्गदर्शन मिळाले.
वाङमय विभागासाठी प्रा. जयंत अभ्यंकर, डॉ.यास्मिन आवटे, नाट्य विभागासाठी प्रा. वेदांग सौंदलगेकर व प्रा. श्रावणी विभुते आणि फाईन आर्टस विभागासाठी प्रा.अतिका राजवाडकर यांनी मार्गदर्शन केले. प्राध्यापक टीम मॅनेजर म्हणून प्रा. मयुरेश पंडित, प्रा. रसिका नाचणकर, प्रा. नीता खामकर, प्रा. प्रणाली मांजरेकर, प्रा. तहसीन वस्ता, प्रा. साक्षी चाळके तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यश सुर्वे, तेजस साळवी व सिद्धी गुरव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले.
सर्व विभागातील विद्यार्थ्यांच्या निवडीचे काम सांस्कृतिक विभाग प्रमुख व रत्नागिरी दक्षिण झोन जिल्हा सांस्कृतिक समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांनी पाहिले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी वाणिज्य विभाग उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. यास्मिन आवटे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व अंतिम स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
५७ व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीसाठी प्रा. ताराचंद ढोबळे; सह-समन्वयक, मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे उपस्थित होते. नवनिर्माण संस्थेचे संस्थापक श्री. अभिजित हेगशेटये, ज्येष्ठ मराठी चित्रपट कलाकार नंदू सावंत, जे जे स्कूल चे माजी डीन प्रा. केणी सर उपस्थित होते.