gogate-college-autonomous-updated-logo

झेप-२०१७ युवा महोत्सव गौरी साबळे दांडेकर मानचिन्ह विजेती

Zep 2017

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सुरु असलेल्या ‘झेप’ वार्षिक युवा सांस्कृतिक महोत्सवात अत्यंत मनाची समजली जाणारी व बावन्न वर्षांची परंपरा असलेली दांडेकर अभिनय स्पर्धेचे विजेतेपद विद्यमान वर्षी गौरी साबळे हिने पटकावले आहे. द्वितीय क्रमांक विशाल कांबळे तर तृतीय क्रमांक साहिल चरकरी आणि रेणुका सरदेसाई यांनी प्राप्त केला.

कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पुढील वर्षी दांडेकर एकांकिका स्पर्धा सुरु करण्याची घोषणा केली. श्री. वैभव मांगले, श्री. रमेशजी कीर, राजन मलुष्टे यांसारख्या अनेक प्रतिथयश व्यक्तींचा सहभाग लाभलेली ही स्पर्धा पूर्वीच्या वैभवासह भविष्यातील कलाकारांसाठी कला अविष्कारांची पर्वणी ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

गोगटे जोगळेकर महाविद्यालया प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी ‘सांस्कृतिक कलागुण नैपुण्यात दांडेकर मानचिन्ह स्पर्धेचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सुचानंसोबत प्रोत्साहित केले. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी स्पर्धकांना खिलाडूवृत्ती जोपासण्याचे मार्गदर्शन केले.

या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून श्री. मनोज भिसे आणि श्री. प्रथमेश भाटकर यांनी काम पाहिले. एकांकिका, नाटक, लघुपट यांतील नैपुण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी मुंबई विद्यापीठातर्फे थिएटर आणि ड्रामा विभागासाठी आंतरविद्यापीठीय स्तरासाठी प्रतिनिधित्व केले आहे. दांडेकर मानचिन्हचे माजी विजेते म्हणूनही त्यांची खास ओळख आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद आंबेकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, डॉ. शाहू मधाळे, प्रा. तुळशीदास रोकडे, प्रा. शरद आपटे, श्री. संदीप चव्हाण, विदार्थी प्रतिनिधी तन्मय सावंत उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी प्रा. सायली पिलणकर आणि प्रा. विनायक गावडे यांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेचे संयोजन प्राथमवर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रिया पेडणेकर आणि नारायणी शहाणे यांनी केले.

Zep 2017
Zep 2017
Zep 2017
Zep 2017
Comments are closed.