gogate-college-autonomous-updated-logo

”गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप अंतर्गत प्रश्नमंजुषा आणि चर्चासत्र संपन्न”

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सुरु असणाऱ्या ‘झेप २०१७’ या वार्षिक युवामहोत्सवातंर्गत प्रश्नमंजुषा आणि चर्चासत्र संपन्न झाले.
महाविद्यालयाच्या कै. ज.शं.केळकर सभागृहात पार पडलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, श्री. दांडेकर, प्रा. जयंत अभ्यंकर आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून प्रा. दानिश गनी आणि अॅड. इंदुमती मलुष्टे लाभले होते. बहुपर्यायी प्रश्न, सामान्यज्ञान आणि महाविद्यालयावर आधारित प्रश्न यांच्या आधारे बाद पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सौरभ शिर्के, ओंकार जावडेकर, ओंकार सुर्वे यांनी प्रथम; सिद्धेश बिर्जे, संतोष दैत यांनी व्दितिय तर निनाद चिंदरकर, अमोघ पोंक्षे आणि श्रीहरी करंदीकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या कार्यक्रमाचे संयोजन व्दितिय वर्ष शास्त्र शाखेच्या विद्यार्थांनी केले होते. परीक्षिका अॅड. इंदुमती मलुष्टे यांनी विद्यार्थांना पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारज्ञान वाढवण्याचा सल्ला दिला. तसेच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतिका राजवाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यानंतर व्दितिय वर्ष वाणिज्य शाखेने संयोजित केलेल्या चर्चासत्राचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. जयंत अभ्यंकर, परीक्षक श्री. उल्हास सप्रे, झेप समन्वयक आनंद आंबेकर, र.ए. सोसायटीचे मंदार गाडगीळ उपस्थित होते. तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये तरुण पिढी आणि सोशल मिडिया, मेक इन इंडिया, महामार्गावरील खड्डे हे विषय देण्यात आले होते. यामधून पाच सर्वोत्कृष्ट वक्त्यांची निवड करून त्यांना ‘महाविद्यालयीन जीवनातील श्रमतावर्धन’ असा विषय देण्यात आला. या अंतिम गटचर्चेतून मैत्रेयी बांदेकर प्रथम, कपिल लिमये व्दितिय तर सौरभ लेले तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चैत्राली केतकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या रचनेचे परीक्षक उल्लास सप्रे यांनी विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे आजची युवा पिढी बहुश्रुत आहे. वास्तवाबाबत जागरूक आहे. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दुर्गा साखळकर हिने केले.

Comments are closed.