gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) ‘स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ उत्साहात संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) 'स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा' उत्साहात संपन्न

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस पुरस्कृत, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय, रत्नागिरी, आयोजित आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दि. ७ डिसेंबर रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त,) रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. वरिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेचे हे २२वे तर कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेचे हे १६वे वर्ष होते. राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी हे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांघिक चषकाचे मानकरी ठरले तर वरिष्ठ महाविद्यालयाचा सांघिक चषक एस. बी. कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी या महाविद्यालयाने पटकावला.

राज्यातील तरुण पिढीची सांगड अध्यात्म, नैतिकता आणि समाजविकास यांसोबत घालावी या उद्देशाने ही वक्तृत्व स्पर्धा स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात येते. या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक- अनुश्री मनोज झाजम (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय , रत्नागिरी); द्वितीय क्रमांक -अदिती अवधूत राज्याध्यक्ष (राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी); तृतीय क्रमांक- उमा सुनील तावडे (माध्यमिक आश्रमशाळा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, निवे); उत्तेजनार्थ प्रथम-प्राची गोविंद सावंत (राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी); उत्तेजनार्थ द्वितीय – तृप्ती आप्पासो मदने (शिरगांव ज्युनिअर कॉलेज शिरगाव, चिपळूण ) यांनी प्राप्त केला तसेच कनिष्ठ गटातील सर्वोत्कृष्ठ संघ मार्गदर्शक हा पुरस्कार श्रीम. महाश्वेता अनंत कुबल, राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी यांना देण्यात आला.

वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक- श्रेया उमेश कुलकर्णी (एस. बी. कीर विधी महाविद्यालय ,रत्नागिरी); द्वितीय क्रमांक – वंशिता अजित भाटकर (एस. बी. कीर विधी महाविद्यालय ,रत्नागिरी); तृतीय क्रमांक- सानिया उदय यादव (कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय ,लांजा); उत्तेजनार्थ प्रथम-रोजीना मुसा साबळे (कला आणि विज्ञान महाविद्यालय, सावर्डे); उत्तेजनार्थ द्वितीय-ओंकार मंदार आठवले (गोगटे -जोगळेकर महाविद्यालय ,स्वायत्त, रत्नागिरी) यांनी पारितोषिके प्राप्त केली तसेच वरिष्ठ गटातील सर्वोत्कृष्ठ संघ मार्गदर्शक म्हणून सौ. संयोगिता शिरीष सासने, एस. बी. कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी यांना गौरवण्यात आले.

या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला स्वामी अद्वयानंद, पावस यांची अभ्यागत म्हणून उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच विकसित भारत निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांची ध्यात्मिक प्रगती होणं ही काळाची गरज आहे. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे काम उत्तम रीतीने करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आणि वेगवेगळ्या स्तरावरची शिबिरे घेण्यासाठी आपल्याला इथे यायला आवडेल असे आश्वासन दिले. वक्तृत्व ही कला आहे. त्याची साधना प्रत्येकाने मनापासून करावी” हे विचार त्यांनी मांडले.

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्षा आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.जयंतराव देसाई, कार्यवाह श्री. हृषिकेश पटवर्धन तसेच गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी, पर्यवेक्षक श्री.विद्याधर केळकर बक्षीस समारंभास उपस्थित होते. सौ.मंजिरी गोखले आणि सौ. पौर्णिमा साठे यांनी कनिष्ठ गटाचे तसेच श्री. सुकांत चक्रदेव आणि श्री.प्रतिक कळंबटे यांनी वरिष्ठ गटाचे परिक्षण केले. समारंभाचे सूत्रसंचालन सौ.अन्वी कोळंबेकर यांनी केले. स्पर्धेच्या संयोजनासाठी स्पर्धा समन्वयक सौ.मानसी गानू तसेच समिती सदस्य श्री.अभिजित भिडे, श्री. हृषिकेश नागवेकर यांनी मेहनत घेतली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.