गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्रातर्फे दि. ०६ डिसेंबर २०२५ रोजी सायं ०६ वा. श्री. सारंग ओक यांचे ‘अवकाशातील आश्चर्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे होणार आहे. श्री. सारंग ओक हे असिमीत, पुणे या संस्थेचे संस्थापक आहेत. ते अनेक वर्षे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून खगोल अभ्यासाचा प्रसार करत आहेत. व्याख्यानानंतर सायं. ०७:३० ते ०८:३० या वेळेत आकाश दर्शनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी प्रा. बाबासाहेब सुतार, समन्वयक, खगोल अभ्यास केंद्र यांच्याशी संपर्क साधावा. सदर व्याख्यान आणि आकाशदर्शन कार्यक्रम रत्नागिरीतील खगोलप्रेमींसाठी खुला असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.






Visitors Online : 0