कोकणातील नामांकित अशा गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी या महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ शनिवार दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभात गोगटे जोगळेकर महाविद्यालय(स्वायत्त), रत्नागिरीमधून मार्च/एप्रिल २०२५ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात विद्यापीठाची पदवी मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. उर्वरित पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या पदवी वितरणाची व्यवस्था महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये करण्यात येईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
मार्च/एप्रिल २०२५ मध्ये पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाची तारीख व वेळ निश्चित झाल्यावर कळविण्यात येईल.
तरी संबंधित विद्यार्थ्यांनी या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.






Visitors Online : 0