gogate-college-autonomous-updated-logo

सेवक कृष्णा भागा आलीम यांना महाविद्यालयातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली

shri-krushna-aalim

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सेवक म्हणून कार्यरत असलेले कृष्णा भागा आलीम यांचे दि. २६ जुलै २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. श्री. आलीम यांना महाविद्यालयात कार्यरत असताना दुपारी जोराचा मेंदूचा झटका आल्याने अत्यवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. दि. १ फेब्रुवारी २०२१ मध्ये आलीम गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सेवक म्हणून रूजू झाले. त्यांनी कार्यालय, स्वच्छतागृह, सेमिनार हॉल, महाविद्यालयाच्या परिसरातील बाग बगिचा या ठिकाणी उत्तम काम केले. कोणत्याही कामाला नकार न देणारा काका म्हणून ते अल्पावधीतच सर्वांच्याच ओळखीचे झाले होते. त्यांना महाविद्यालयाचा ‘आदर्श कर्मचारी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रविवार दि. २६ जुलै रोजी त्यांच्यावर मूळ गावी करबुडे, उगवती पाचकुडे वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दि. २७ जुलै रोजी महाविद्यालयात श्री. कृष्णा आलीम यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयात त्यांनी केलेल्या कामांच्या स्मृतींना उजाळा दिला. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संखयेने उपस्थित होते.

Comments are closed.