प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीमधील महत्वाचा विषय म्हणजे “गुरु-शिष्य परंपरा”. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार या विषयाची व्याप्ती समजून घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावर त्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा येथील श्री. गोविंद भारद्वाज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
गुरु शिष्य नाते, गुरूंचे मार्गदर्शन, आपली बौद्धिक, भावनिक, व आध्यात्मिक प्रगती तसेच मूल्यशिक्षण ज्यामध्ये स्वयंप्रेरणा, त्याग, प्रेमभावना, समानता इ. चे महत्व त्यांनी स्लाईड शो व स्पष्टीकरणाद्वारे मांडले. भारतीय ज्ञान परंपरेचे यथार्थ दर्शन यामुळे विद्यार्थांनी अनुभवले.
कार्यक्रमप्रसंगी वाणिज्य विभाग उपप्राचार्य डॉ. सीमा कदम यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तर डॉ. यास्मिन आवटे यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला. प्रास्ताविक प्रा. हर्षदा पटवर्धन यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
![]() |
![]() |







Visitors Online : 3