gogate-college-autonomous-logo

‘विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रीय प्रतिमानाचे उपयोजन प्रत्यक्ष जीवनात करण्यावर भर द्यावा’ – प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागात अर्थशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागात अर्थशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, संज्ञानात्मक, सर्जनशील आणि सामाजिक कौशल्यांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. अनुभवात्मक विचार, आंतरशाखीय दृष्टिकोन यावर भर देऊन विद्यार्थांची सर्जनशीलता आणि तार्किक विचार वृद्धिंगत व्हावेत तसेच विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगारभिमुख बनविणे या उद्देशाने गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील अर्थशास्त्र विभागा मार्फत अर्थशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

अर्थशास्त्र विषयातील संकल्पना अनेकांना क्लिष्ट वाटतात परंतु या  प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर व मॉडेल्सद्वारे अर्थशास्त्र हा विषय समजण्यास सुलभ केला. प्रदर्शन सादरीकरणात सहभागी विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विषयाच्या अनेक संकल्पनांचे सोप्या भाषेत विवेचन केले.  पोस्टर, मॉडेल, रांगोळी, चित्रे व आकृत्या या माध्यमातून आपली सदरीकरण कौशल्ये अधिक विकसित केली.

वित्तीय साक्षरता , केंद्रीय अर्थसंकल्प, महागाई , बेरोजगारी आणि दारिद्र्य, रिफायनरी, प्रदूषण आणि शाश्वत ग्रामीण विकास, स्वयंपूर्ण ग्राम अर्थव्यवस्था, कृषी आणि ग्रामीण पर्यटन, स्मार्ट सिटी,  सेंद्रिय शेती, कृषी आणि ग्राम पर्यटन, कृषी पूरक व्यवसाय, अर्थशास्त्रातील करियर संधी अशा विविध विषयावर विद्यार्थांनी पोस्टर आणि मॉडेल सादर केली. हे नाविन्यपूर्ण अर्थशास्त्रीय प्रदर्शन पाहण्याचा लाभ महाविद्यालयातील तसेच इतर महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घेतला.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी प्रदर्शनाला भेट देऊन अर्थशास्त्र विभागामार्फत अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल विभागाचे आणि विद्यार्थांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रीय प्रतिमानाचे उपयोजन प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात करण्यावर भर द्यावा. ग्राम विकास आणि स्वयंरोजगारसाठी असणाऱ्या  शासकीय योजना  युवा पिढीने लोकांच्या पर्यंत पोहाविण्याचा प्रयत्न करावा. ग्रामीण भागातील युवकांनी अर्थशास्त्रीय प्रतिमानाचे उपयोजन करून रोजगार देणारे व्हावे. विद्यार्थ्यांचा प्रदर्शनातील सहभाग आणि विविध मॉडेल सादरीकरणाचा आत्मविश्वास त्यांच्या भावी जीवनात उपयोगी ठरेल असे त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

उपक्रमातील सर्व विद्यार्थी, विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे, सहकारी प्राध्यापक प्रा. एस. एम. पोटे, डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सुर्यकांत माने यांच्या या सहकार्यातून संपन्न झालेल्या या उपक्रमास  त्यांनी शुभेच्छा दिल्या. अर्थशास्त्रीय पोस्टर व मॉडेल प्रदर्शनाचे उद्घाटन कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले. या उद्घाटनप्रसंगी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे, हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. वासुदेव आठल्ये, प्रा. सचिन सनगरे, प्रा. कृष्णात खांडेकर उपस्थित होते. अर्थशास्त्र विभागातर्फे प्रदर्शित झालेल्या या प्रदर्शनाला बहुसंख्य विद्यार्थ्याचा तसेच महाविद्यालयीन शिक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया फलकावर नोंदविल्या. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग अर्थशास्त्र विषय जनसामान्यांपर्यंत सुलभ पद्धतीने पोहचण्यासाठी अशा प्रकारच्या  विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन सातत्याने करत असते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागात अर्थशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागात अर्थशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागात अर्थशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन
Comments are closed.