gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये दि. १९ जानेवारी रोजी ‘बावडेकर व्याख्यानमाले’चे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य डॉ. वि के बावडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते; यंदाचे या व्याख्यानमालेचे ३८वे वर्ष आहे.

व्याख्यानमालेचे ३८वे पुष्प गुंफण्यासाठी प्रो. भास बापट उपस्थित राहणार आहेत. प्रो. बापट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च अर्थात आयसर, पुणे येथे भौतिकशास्त्र विषयात कार्यरत आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘आदित्य एल- १ बहुआयामी सौर वेधशाळा’ असणार आहे.

भारताची पहिली सौर वेधशाळा अर्थात आदित्य एल- १ च्या बांधणीत प्रो. बापट यांचे महत्वाचे योगदान आहे.प्रो. भास बापट यांनी आदित्य ‘सोलर विंड पार्टिकल एक्स्पीरीमेंट’ची निर्मितीअहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबरोटरीमध्ये असताना केली. या संशोधनाच्या कामासोबतच प्रो. भास बापट ‘एकलव्य’ या संस्थेमार्फत शालेय विज्ञान शिक्षण कार्यक्रमात ही सहभागी होतात.

दि.१९ जानेवारी २०२४ रोजी दु. ०३ वा. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन असणार आहेत.

तरी रत्नागिरीमधील सर्व विज्ञानप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Comments are closed.