‘रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे’ ही सामाजिक बांधिलकी जपून र. ए. सोसायटी गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी व ओ. पी. जिंदल छात्रावास यांच्या संयुक्त विद्यमाने आणि धन्वंतरी संस्था, रत्नागिरी यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी सक्रिय सहभाग घेऊन रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचे सिद्ध केले.
शिबिराचे उद्घाटन धन्वंतरी संस्थेचे अध्यक्ष श्री. अजय भिडे यांनी केले. यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर उपस्थित होते. तसेच धन्वंतरी संस्थेचे कार्यवाह श्री. समीर करमरकर, वैभवलक्ष्मी रक्तपेढीचे संचालक श्री. कामत व त्यांचे सहकारी आणि परकार हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी शिबिराला उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ओ. पी. जिंदल छात्रावासचे अधिक्षक प्रा. मंगेश भोसले आणि वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
रक्तदान शिबीर यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे, संस्थेचे सहसचिव प्रा. श्रीकांत दुदगीकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.