gogate-college-autonomous-updated-logo

एम. एस.सी डेटा सायन्सच्या विद्यार्थ्याची सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील एम.एस्सी. डेटा सायन्स अभ्यासक्रमाचा विद्यार्थी करण महेश मिलके याची iLosung Private Limited या कंपनीमध्ये Associate Software Developer म्हणून निवड झाली आहे व वार्षिक ३.६० लाखांचे (CTC) पॅकेज देण्यात आले आहे.

करण यांची प्रारंभी तीन महिन्यांसाठी Associate Software Developer या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना Software Developer या पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यांची नियुक्ती पुणे येथील प्रकल्पस्थळी करण्यात आली आहे.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसोबतच ग्राहक सेवा, तांत्रिक दस्तऐवजीकरण, व्यवसाय प्रक्रियेत सुधारणा, कार्यक्षमता वाढविणे तसेच प्रकल्पाशी संबंधित विविध तांत्रिक जबाबदाऱ्या ते पार पाडणार आहेत.

करण महेश मिलके हा गोगटे जोगळेकर  कॉलेजच्या भौतिकशास्त्र विषयाचा पदवीधर असून सध्या  डेटा सायन्स  विभागात एम.एस्सी. करत आहे.  अभ्यासासोबतच उत्कृष्ट जलतरणपटू म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी विविध जलतरण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदके व ट्रॉफी प्राप्त केल्या आहेत. शिक्षण, तांत्रिक कौशल्य आणि क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरी यांचा सुंदर समन्वय साधत त्यांनी ही उल्लेखनीय करिअरची संधी मिळवली आहे.

डेटा सायन्ससारख्या आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच उद्योगक्षेत्रातील विविध संधींसाठी तयार केले जात आहे. करण यांच्या यशामुळे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या एम.एस्सी. डेटा सायन्स विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

करण मिलके यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, आय.टी.-सी.एस. समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे तसेच विभागातील प्राध्यापकवर्ग यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.