![]() |
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स भाग-२ अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी पार्वती रावल हिची Pleximus Inc. या कंपनीमध्ये Jr. HR Executive म्हणून निवड झाली आहे. शिक्षण घेत असतानाच तिने कॉर्पोरेट क्षेत्रात आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
पार्वती रावल ही सध्या एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स भाग-२ चे शिक्षण घेत आहे. कॉम्प्युटर सायन्ससारख्या आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच विविध उद्योगक्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधींची ओळख करून देण्यावर महाविद्यालयाचा भर आहे. पार्वती रावल हिची ही यशस्वी व्यावसायिक वाटचाल इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
पार्वती रावल हिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, आय.टी.-सी.एस. समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे तसेच विभागातील प्राध्यापकवर्ग यांनी तिचे अभिनंदन करून पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








Visitors Online : 3