gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महावि‌द्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘जागतिक खारफुटी दिनानिमित्त’ शिवाजी हायस्कूल येथील प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mangrove exhibition at shivaji Highschool

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जागतिक खारफुटी दिनाचे औचित्य साधून शिवाजी हायस्कूल येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळणार्‍या विविध खारफुटी वनस्पती, त्यांच्यामध्ये आढळून येणारी वैशिष्ट्य यांबद्दल वनस्पतिशास्त्र विषयाच्या द्वितीय व तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना याविषयी माहिती दिली. तसेच तेथे असणाऱ्या खारफुटी वनस्पती त्यांचे त्या परिसंस्थेतील महत्त्व आणि खारफुटीच्या तोडीमुळे तेथे उ‌द्भवणाऱ्या समस्या याबद्दल जाणून घेतले. या प्रदर्शनामध्ये रायझोफोरा म्युक्रोनाटा, रायझोफोरा अपेटला, लुमनित्झेरा, अविसेनिया, एजिसेरास, सेरियोप्स, अकॅथस, सोनरेशिया या खारफुटी वनस्पतींची माहिती देण्यात आली तसेच श्वसन मुळे आणि आधार मुळांचे विविध प्रकारही या दरम्यान प्रदर्शित केले गेले. खारफुटी वनस्पतींच्यासोबतच वाढणाऱ्या सहयोगी वनस्पती यांच्याबद्दलही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या सहयोगी वनस्पतीमध्ये करंज, खुळखुळी, डेरीस इत्यादीचा समावेश होता.

शिवाजी हायस्कूलमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला या प्रदर्शनाचे उद्घाटन वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ सोनाली कदम, प्रशालेतील श्री दीपक पाटील, श्री तानाजी गायकवाड, श्री सुतार सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनासाठी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ मकरंद साखळकर व विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ अपर्णा कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी वनस्पतिशास्त्र विभागातील डॉ विराज चाबके, प्रा. ऋजुता गोडबोले आणि प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे यांनी मोलाचे सहाय्य केले.

Comments are closed.