गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) रसायनशास्त्र विभागातर्फे या वर्षी १४ ऑगस्ट रोजी मॉडेल मेकिंग व पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेचे आयोजन करून राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन साजरा करण्यात आला. भारतात रसायनशास्त्राचा पाया रचणारे महान वैज्ञानिक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा २ ऑगस्ट हा जयंती दिन, दरवर्षी राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी भारतात रसायनशास्त्राचा पाया रचला. त्यांना “फादर ऑफ इंडियन केमिस्ट्री” म्हणून ओळखले जाते. विज्ञानाचा उपयोग देशाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी झाला पाहिजे याच विचारातून १९०१ मध्ये Bengal Chemical and Pharmaceutical Works स्वदेशी औषधनिर्मिती उद्योगाची स्थापना केली. ही कंपनी भारताची पहिली स्वदेशी औषधनिर्मिती कंपनी म्हणून ओळखली जाते. त्यांच्या महान वैज्ञानिक योगदानाचा आणि भारतीय रसायनशास्त्र विकासातील त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दि. २ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस साजरा केला जातो.
रसायनशास्त्र विभागाने या निमित्त मॉडेल मेकिंग व पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा इयत्ता अकरावी – बारावी तसेच पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. स्पर्धेमध्ये ७८ विद्यार्थी सहभागी झाले होते. श्री. डी. डी. जोशी (प्राध्यापक फिनोलेक्स इंजीनियरिंग कॉलेज रत्नागिरी), श्री. व्ही. टी. केळकर (माझी अध्यापक, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी) यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. तसेच कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. पी. पी. कुलकर्णी (संचालक, रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठ रत्नागिरी), डॉ. मिलिंद गोरे (माजी प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय), प्रा. सुनील गोसावी (उपप्राचार्य, विज्ञानशाखा अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय) देखील उपस्थित होते.
डॉ. अपर्णा कुलकर्णी (उपप्राचार्य विज्ञान शाखा व रसायनशास्त्र विभाग प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र विभागातील इतर प्राध्यापकांनी या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
![]() |
![]() |
![]() |










Visitors Online : 3