gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील कु. तन्वी चंद्रकांत सुतार हिची ‘डेटा एनालिस्ट’ म्हणून निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कु. तन्वी चंद्रकांत सुतार हिची भारतातील नामांकित संशोधन संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर), हैदराबाद येथे ‘डेटा एनालिस्ट’ म्हणून नियुक्ती झाली आहे. ही नियुक्तीबिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ग्रँट अंतर्गत करण्यात आली आहे.

टीआयएफआरकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत नियुक्तीपत्रानुसार कु. तन्वी सुतार यांची नियुक्तीकरण्यात आली असून त्यांचे कार्यस्थळ बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डेरवण, ता. चिपळूण असेल. डेटा विश्लेषण, संगणकशास्त्र आणि संशोधन क्षेत्रातील कौशल्यांना मिळालेली ही महत्त्वपूर्ण संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. देशातील अग्रगण्य संशोधन संस्थेशी संबंधित प्रकल्पात काम करण्याची संधी मिळणे ही त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.

कु. तन्वी सुतार यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, आय.टी.-सी.एस. समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे तसेच विभागातील प्राध्यापकवर्ग यांनी तिचे अभिनंदन करून पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.