gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘विषय निवड आणि पडताळणी कार्यशाळा’ संपन्न

vishay-nivad-aani-padatalani-karyashala-3

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत मुंबई विद्यापीठाची विषय निवड आणि पडताळणी कार्यशाळा रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील ५३ महाविद्यालयातील १५० प्राचार्य आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा.रविंद्र बांबर्डेकर,कला शाखेच्या अधिष्ठाता प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक,डीआयसीटीचे संचालक प्रा. सतिश झेंडे, चरित्रकार धनंजय कीर विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरीचे संचालक डॉ. पी. पी.कुलकर्णी, प्राचार्य हिरेन दंड,डॉ.राजेंद्र पाटील आणि व्यवस्थापन परिषद सदस्या प्राचार्या डॉ. देशमुख यांची उपस्थिती लाभली.

आपल्या प्रास्तविकपर मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी कार्यशाळेच्या आयोजना मागील हेतू स्पष्ट केला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत वाटचालीवर प्रकाश टाकला.

कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करताना मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा. रविंद्र बांबर्डेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत श्रेयांक रचनेचा मागोवा घेतला. संलग्नित महाविद्यालयातील पहिली बॅच२०२६-२७ मध्ये पदवी घेऊन बाहेर पडणार असल्याने महाविद्यालयास येणाऱ्या अडचणी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी ही कार्यशाळा असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राबविण्यात आलेल्या विषय निवडी आणि श्रेयांक रचना यांची पडताळणीही केली जाणार असल्याचे सांगितले.

डीआयसीटीचे संचालक प्रा. सतिश झेंडे यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा पद्धती आणि त्यामधील तांत्रिक बदल यावर मार्गदर्शन केले.ई-समर्थ पोर्टल विषयी माहिती सांगितली. महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना ई-समर्थ पोर्टलची उपयुक्तता अधोरेखित केली. दिवसभर कला आणि वाणिज्य शाखांची आणि विज्ञान शाखांची स्वतंत्र व्यवस्था लावून तज्ञांनी संलग्नित महाविद्यालयाच्या अडचणी आणि शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाचे निवेदन आणि आभार प्रदर्शन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.

Comments are closed.