गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिन’ अत्यंत उत्साहात आणि विविध रचनात्मक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे औचित्य साधत, आजच्या तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी आणि समाजात आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘नशा मुक्त भारत’ या महत्त्वपूर्ण विषयावर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यालयात नशामुक्त भारत ची शपथ घेऊन उपक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वयंसेवकांनी पोस्टर स्पर्धेचे नियोजन केले. व्यसनांमुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे आणि तरुणाईचे होणारे नुकसान यावर लक्ष वेधत, निरोगी व आनंदी जीवनाचा संदेश देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेतील पोस्टर चे प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने सर्वांसाठी खुले करण्यात आले.
महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या स्वयंसेवकांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या आकर्षक घोषणावाक्यांच्या (Slogans) साहाय्याने व्यसनाचे शरीरावर, मनावर आणि समाजावर होणारे दुष्परिणाम अत्यंत प्रभावीपणे मांडले.या स्पर्धेत उत्कृष्ट व प्रबोधनपर कलाकृती सादर करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थांना विभागाच्या वतीने विशेष सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्राध्यापक वर्ग तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन सनगरे, प्रा. उमा जोशी, प्रा. हर्षदा पटवर्धन, डॉ. विराज चाबके आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
![]() |






Visitors Online : 1