प्रतिवर्षाप्रमाणे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात हिंदी पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने दरवर्षी राष्ट्रभाषा हिंदी दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यमान वर्षी महाविद्यालयातील हिंदी विभाग आणि वाङमय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने‘हिंदी रोजगार और नवाचार’या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याव्याख्यानास डॉ. भीमराव आंबेडकर महाविद्यालय, दिल्ली विश्वविद्यालय, दिल्लीचेडॉ. अनिल कांबळेहे प्रमुख पाहुणे व्याख्याते म्हणून लाभले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्याविविधलेखांच्या भित्तिपत्रकाचेअनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर वमान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी हिंदी पंधरवडा साजरा करण्यामागीलपार्श्वभूमी, हिंदी पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयात आयोजित केले जाणारे उपक्रम यांची थोडक्यात माहिती दिली. डॉ. चित्रा गोस्वामीयांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिंदी पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयानेसामंजस्यकरार करण्यात आलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीआणिमहाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी घेण्यात आलेल्या हिंदीनिबंध,काव्य वाचन व पोस्टर सादरीकरणस्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र आणि पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यातआला. हिंदी निबंध स्पर्धेतसानिया मौला शेख, वैष्णवी राजन पेडणेकर,आयुश अच्युत पवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्तकेलेतरप्रेरणा केशव कांबळे,मिताली संदीप मांडवकर, मधुरा अशोक पाटील यांनाउत्तेजनार्थपारितोषिक प्राप्त केले.यास्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. चित्रा गोस्वामी,प्रा. कृष्णात खांडेकर आणि प्रा. गौरी बोटकेयांनी कामपाहिले. हिंदीकाव्य वाचन स्पर्धेतअंजली चौहान,दीप्ती झगडे वसेजल मेस्त्री यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जेष्ठकवयत्री श्रीम. सुनेत्रा जोशी वडॉ. शाहू मधाळे यांनी काम पाहिले.
हिंदी पंधरवड्याचे औचित्य साधूनप्रथम वर्ष व तृतीय वर्षाच्यापदवीस असणाऱ्या हिंदी विभागातीलविद्यार्थ्यांसाठीहिंदी पोस्टर सादरीकरणस्पर्धा घेण्यात आली. यातप्रथमवर्षासाठीखान सबिहान्ज आणि ग्रुप, लोकरे अनुष्का आणि ग्रुप, काझी रुक्सार आणि ग्रुपयांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले तरतृतीयवर्षासाठीसानिका महेंद्रपवार, अंजली पवनकुमार चौहान वकुणाल संदीप शिंदेयांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. सचिन सनगरे वडॉ. सीमा वीर यांनी काम पाहिले.
उपस्थितांना ऑनलाइनमार्गदर्शन करताना डॉ. अनिल कांबळेयांनी हिंदी भाषा, तिचा उद्गम आणि विकास, समकाळातीलहिंदी भाषेचे महत्त्व, हिंदी भाषेतील रोजगाराच्या विविध संधीअशा विविध पैलुंवर प्रकाश टाकला. भारतापुरत्या सीमित असलेल्या हिंदी भाषेने जागतिकीकरणाच्या काळात आपल्या सीमा ओलांडल्या आहे. विदेशातील अनेक विद्यापीठात हिंदी भाषेचे अध्ययन –अध्यापन होऊ लागले आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचेअध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनानिमित्त विविध अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.विद्यार्थ्यांनीहिंदी भाषेविषयी आस्था बाळगून हिंदी भाषेतील साहित्याचे अवांतर वाचन केले पाहिजे, समाजात हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार केला पाहिजे तसेच हिंदी विभागातील पीएच.डी. संशोधनकेंद्रातून विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त करावी,असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचेसूत्रसंचालन प्रा.कृष्णात खांडेकर आणि आभारप्रदर्शन प्रा.गौरी बोटकेयांनी केले. याप्रसंगीव्यासपीठावरकला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाङमय मंडळाचे प्रमुख डॉ. शिवराजगोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संखेने विद्यार्थ्यांसह प्राध्यापक उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





Visitors Online : 1