gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) महिला कबड्डी संघाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग महिला कबड्डी स्पर्धेत रौप्य पदकासह स्पर्धेतील उपविजेतेपद पटकावले

कोंकण विभाग व ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय, भातगाव खेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग- क्र. ४ आंतरमहाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धा एस.व्ही.जे.सी.टी स्पोर्टस कॅम्पस, डेरवण येथे घेण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाने रौप्य पदकासहीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच सन २०२६-२७ कोंकण विभाग महिला कबड्डी स्पर्धेचे सांघिक उपविजेतेपद प्राप्त केले आहे. रौप्य पदक प्राप्त महिला कबड्डी संघात नंदिनी कोचारे (एम.ए.); बिस्ना थापा, अमिता गावडे, ,आकांशा भातडे, सानिया शेख (तृतीय वर्ष कला); मैथिली गावकर, त्रिशा मोहिते, सायली डांगे, प्राची भोंगले (प्रथाम वर्ष वाणिज्य); चंदना वाकडे, सलोनी कांबळे, अपूर्वा गुरव (प्रथम वर्ष कला); श्रावणी शेलार, श्रावणी शिंदे (द्वितीय वर्ष विज्ञान) या विद्यार्थिनींनचा सहभाग होता. महिला कबड्डी संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन व क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, श्री. सचिन साळवी, श्री. दत्तात्रय किर यांचे सहकार्य लाभले.

मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग क्र.४ महिला कबड्डी स्पर्धेत रौप्य पदक व उपविजेतेपद प्राप्त करणाऱ्या महिला कबड्डी संघाला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकिय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.