रत्नागिरी: मराठी विज्ञान परिषदेतर्फे विद्यार्थी गटासाठी “घरातील रसायनशास्त्र” तर खुल्या गटासाठी “युद्धाचे हवामानावर परिणाम” या विषयावर राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर व ठाणे येथून विद्यार्थी गटात एकूण १४१ व खुल्या गटातून ५९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थी गटाकरिता सौ. रुणा नागवेकर व श्री. अजय ठिक, अभ्यंकर – कुलकर्णी कनिष्ट महाविद्यालय, रत्नागिरी तसेच खुल्या गटाकरिता डॉ. दीप्ती जाधव व श्री. परेश गुरव, गोगटे – जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थी गटात प्राची सचिन काळे (एल. टी.टी. इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, जि. रत्नागिरी) व दिव्या जयंत गांवकर (शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव, जि. सिंधुदुर्ग) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच खुल्या गटातून शिवम राजेश कविटकर (मु. पो. महादेवाचे केरवडे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) आणि देवयानी सुनील जोशी (आठल्ये – सप्रे – पित्रे, कनिष्ठ, महाविद्यालय, देवरुख, जि. रत्नागिरी) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. विजेते स्पर्धक यांना मुंबई व कोंकण विभागाकडून मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देण्यात येईल. सदर स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. उमेश संकपाळ यांनी काम पाहिले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.





Visitors Online : 1