gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘पदवीदान समारंभ’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'पदवीदान समारंभ' संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे दि. २६ एप्रिल २०२४ रोजी स्नातक व अधिस्नातक पदवीदान समारंभ संपन्न झाला.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत विशेष कौशल्य संपादन करण्याविषयी सुचविले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. किशोर सुखटणकर, प्रभारी संचालक, मुंबई विद्यापीठ, उपकेंद्र, रत्नागिरी यांनी आपल्या मनोगतातून मुंबई विद्यापीठाचा वैभवशाली वारसा आणि प्रवास विषद केला. विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करत राहिले पाहिजे आणि सुजाण नागरिक बनले पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला. पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देताना माजी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी सलग्न राहण्याची अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
समारंभासाठी उपस्थित विशेष अतिथी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष डॉ. सितोळे यांनी पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे अशी अशा व्यक्त केली. तसेच नवीन रोजगाराच्या संधी शोधून काढण्याचे आवाहन केले.यानंतर प्रातिनिधिक स्वरुपात कु. प्रीती टिकेकर आणि कु. शुभराणी होरंबे या दोन विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी अध्यक्षीय समारोपामध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना स्वत:च्या मानसिक आरोग्याची काळजी घेत राहण्यास सुचविले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पदवीदान समारंभ पार पडला.

सदर कार्यक्रमचे आभारप्रदर्शन डॉ. विवेक भिडे यांनी केले. प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Comments are closed.