विद्यापीठ स्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे अंतिम सादरीकरण दि. १८डिसेंबर २०२५ रोजी मुंबई विद्यापीठ विद्यार्थी भवन, चर्चगेट येथे पार पडले. विद्यार्थ्याच्या आविष्कार संशोधन स्पर्धेत पदवी स्तरावर C1- मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला या गटातून सादर केलेल्या भूगोल विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त ), रत्नागिरी यांच्या प्रकल्पाला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमधून एकूण १२ प्रकल्प सहभागी होते.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती जोपासावी, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा व सद्यस्थितीतील समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी आविष्कार ही संशोधन स्पर्धा आयोजित केली जाते. जिल्हा, विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली जाते. भूगोल विभागाच्या वतीने ‘शाश्वत विकास ध्येये १७ च्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत स्तर मूल्यमापन प्रणाली’ या विषयावर संशोधन सादर केले गेले. याचे माहिती संकलन व सादरीकरण कु. सेजल भार्गव मेस्त्री (TYBA) आणि कु. प्रथम गणेश बंडबे (TYBA) या विद्यार्थ्यांनी केले. हा प्रकल्प महाविद्यालय, जिल्हा स्तर, विद्यापीठ स्तर पोस्टर सादरीकरण आणि अंतिम सादरीकरणासाठी निवडला गेला. या प्रकल्पासाठी प्रशासकीय उपप्राचार्य व विभागप्रमुख प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, सहाय्यक प्राध्यापक विनायक गावडे, सहाय्यक प्राध्यापक सोनाली कुरतडकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्याच्या यशाबद्दल कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

डॉ. दिलीप पाटील, संचालक, विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या उपस्थितीत
प्रमाणपत्र स्वीकारताना विद्यार्थी व मार्गदर्शक






Visitors Online : 0