गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील गौरांग नामजोशी (तृतीय वर्ष कला, भूगोल), साक्षी बेर्डे, पियुष परब (तृतीय वर्ष विज्ञान, जैवरसायनशास्त्र), मुग्धा जाधव आणि चित्रा फणसेकर (तृतीय वर्ष विज्ञान, वनस्पतीशास्त्र) या पाच विद्यार्थ्यांनी ब्रिटिश कौन्सिल, HSBC आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित COOL CRYMB – Climate Skills: Seeds for Transition India (Phase II) या प्रशिक्षण कार्यक्रमात उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. हा पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. २७ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी, मुंबई विद्यापीठ, कालिना कॅम्पस, मुंबई येथे संपन्न झाला.
या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना हवामान बदल, शाश्वत विकास, नेतृत्वगुण आणि हरित उद्योजकता याविषयी सखोल ज्ञान व व्यावहारिक कौशल्ये तज्ज्ञांची व्याख्याने, संवादात्मक कार्यशाळा, गटचर्चा तसेच विविध कृतींमधून प्राप्त झाली. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना ‘रत्नागिरी जिल्हा क्लायमेट यंग लीडर्स’ (Climate Young Leaders of Ratnagiri District) म्हणून मान्यता देण्यात आली. या भूमिकेत ते रत्नागिरी जिल्ह्यातील Community Co-Creation Lab च्या माध्यमातून हवामान कृती, पर्यावरण जनजागृती, शाश्वत विकास आणि स्थानिक समुदायाच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार आहेत.
या विद्यार्थ्यांना श्री. शरद आपटे व श्री. परेश गुरव Climate Skills Programme चे Faculty Coordinators यांचे मार्गदर्शन लाभले.
![]() |
![]() |







Visitors Online : 3