gogate-college-autonomous-updated-logo

‘चतुरस्त्र नेतृत्व ही काळाची गरज’ – प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी (गोडबोले विद्यालय केळ्ये येथे स्वयंसेवक नेतृत्व प्रशिक्षण व ग्राम अध्ययन कार्यशाळा संपन्न)

गोडबोले विद्यालय केळ्ये येथे स्वयंसेवक नेतृत्व प्रशिक्षण व ग्राम अध्ययन कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे एकत्रित स्वयंसेवक नेतृत्व प्रशिक्षण व ग्राम अध्ययन कार्यशाळा दि. ०३ सप्टेंबर रोजी श्री. शांताराम यशवंत गोडबोले विद्यामंदिर, केळ्ये येथे संपन्न झाले. कार्यशाळेची सुरुवात एन्.एन्.एस्. लक्ष्य गीत गायनाने झाली. प्रथमसत्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या एन्.एन्.एस्.चे  माजी कार्यक्रमाधिकारी  श्री. प्रभात कोकजे आणि आजी कार्यक्रमाधिकारी श्री. निनाद तेंडुलकर यांनी घेतले. या सत्रात त्यांनी एन्.एन्.एस्. अंतर्गत येणारे विविध उपक्रम व त्यासाठी करावे लागणारे नियोजन याविषयी तसेच चांगल्या नेतृत्वाची लक्षणे आणि नेतृत्वभान याविषयी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

या सत्रानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. उदघाटन प्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य   डॉ. पी.पी. कुलकर्णी, केळ्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सौरभी पाचकुडवे, उपसरपंच श्री. काशिनाथ बापट, ज्येष्ठ उद्योजक श्री. सुहास सहस्रबुद्धे हे उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी सौ. पाचकुडवे, श्री. बापट आणि प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले व शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.

उदघाटन समारंभानंतर प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी “नियोजन आणि कार्यप्रणाली” याविषयी मार्गदर्शन सत्रात शिबिर्थींना मार्गदर्शन करताना नेतृत्वाच्या विविध पैलूंविषयी स्वयंसेवकांशी चर्चा केली. एकंदरीतच सक्षम नेतृत्वासाठी व्यक्तीच्या अंगी आत्मविश्वास, सामाजिकजाणीव, वेळेच्या नियोजनाची क्षमता, कामांना योग्यप्राधान्यक्रम देण्याची क्षमता, भाषिक, संभाषण कौशल्ये इत्यादी गोष्टी अत्यंत महत्वाच्या असल्याचे सांगितले. विद्यार्थांशी संवाद साधून त्यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर तिसऱ्या सत्रात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. उमा जोशी यांनी स्वयंसेवकांकडून समूहगीते म्हणवून घेतली. त्या गीतांचे अर्थ सांगितले. चौथे सत्र गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. हर्षदा पटवर्धन यांनी स्वयंशिस्त या विषयावर घेतले. हे सत्र व्याख्यानाच्या नाही तर विविध व्यवस्थापनिय खेळांच्या माध्यमातून घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पण उत्साह संचारला. दुपारी भोजनानंतरचे पाचवे सत्र गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे  डॉ. दिनेश माश्रणकर यांनी घेतले. या सत्राचा विषय होता ‘ग्रामअध्ययन.’ शाश्वत ग्रामविकासासाठी युवकांचे योगदान कशाप्रकारे असू शकते, समस्यांची जाणीव व त्यांची उकल यांबद्दल त्यांनी मुलांना चर्चेच्यामाध्यमातून मार्गदर्शन केले. अंतिमसत्र म्हणजे पथनाट्य! या विषयीचे मार्गदर्शन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. सचिन सनगरे यांनी केले. पथनाट्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या, ती कशी सादर करावी याविषयी सांगून शिबिरार्थींना स्वच्छता व जल संवर्धन या विषयाची पथनाट्ये सादर करायला सांगितली.

संपूर्ण दिवस सुरू असणाऱ्या शिबिरात वरिष्ठ महाविद्यालयातील १६ तर कनिष्ठ महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अनेक माजी विद्यार्थांनी या कार्यशाळेस भेट दिली. कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. दानिश गनी यांनी केले. संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. उमा जोशी यांनी केले. तर आभारप्रदर्शनाची जबाबदारी प्रा. सचिन सनगरे यांनी उचलली. प्रा. अभिजित भिडे व स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

गोडबोले विद्यालय केळ्ये येथे स्वयंसेवक नेतृत्व प्रशिक्षण व ग्राम अध्ययन कार्यशाळा संपन्न गोडबोले विद्यालय केळ्ये येथे स्वयंसेवक नेतृत्व प्रशिक्षण व ग्राम अध्ययन कार्यशाळा संपन्न गोडबोले विद्यालय केळ्ये येथे स्वयंसेवक नेतृत्व प्रशिक्षण व ग्राम अध्ययन कार्यशाळा संपन्न
Comments are closed.