कोंकण विभाग व नवनिर्माण शिक्षण संस्थेचे एस.पी. हेगशेट्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग – क्र.4 आंतर महाविद्यालयीन पुरुष आणि महिला बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ ते २ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या महिला संघाने सुवर्ण पदका सहीत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच सन २०२६-२७ कोंकण विभाग बुध्दिबळ स्पर्धेचे सांघिक कामगिरीच्या जोरावर सलग पाचव्या वर्षी अजिंक्यपद प्राप्त केले आहे.
तर पुरुष संघाने रौप्य पदक प्राप्त करून दुसरा क्रमांक प्राप्त केला. सुवर्ण पदक प्राप्त GJC महिला बुद्धिबळ विजयी संघामध्ये खालील विद्यार्थिनींचा समावेश होता. कु. हिमानी फाटक (एम.ए.); कु. अस्मिता खानविलकर (तृतीय वर्ष विज्ञान); कु. निर्मिती सुर्वे (प्रथम वर्ष विज्ञान); कु. गौरवी गावडे (द्वितीय वर्ष विज्ञान); कु. तेजश्री डोलकर (तृतीय वर्ष विज्ञान); कु.अस्मिया साटविलकर (प्रथम वर्ष विज्ञान) या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
तर रौप्य पदक प्राप्त GJC पुरुष बुध्दिबळ संघात खालील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कु. कौस्तुभ हर्डीकर(द्वितीय वर्ष विज्ञान); कु. यश तरळ (एम.कॉम.); कु. श्रेयस दाते (एम.कॉम.); कु. हर्ष सूर्वे (एम.कॉम.); कु. श्रवण बांदेकर (प्रथम वर्ष विज्ञान); कु. अद्वैत काळे (प्रथम वर्ष बीबीए) हे विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या पुरुष व महिला बुद्धिबळ संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे ,श्री.विवेक सोहनी यांचे मार्गदर्शन व क्रीडा शिक्षक प्रा कल्पेश बोटके, श्री महेश खैरे यांचे सहकार्य लाभले.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग क्र.४ बुद्धिबळ महिला स्पर्धेत सुवर्ण पदकाची व विजेतेपदाची हॅट्रिक साधणाऱ्या महिला संघाला तसेच रौप्य पदक प्राप्त पुरुष बुद्धिबळ संघाला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकिय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई; तीनही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







Visitors Online : 0