महाविद्यालयीन विद्यार्थांना भविष्यकालीन व्यवसाय संधी निर्माण करून देण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालय विविध कार्यशाळांचे आयोजन करीत असते. या कार्यशाळांतून विद्यार्थांना नाविन्यपूर्ण व व्यवसाय उपयोगी रोजगार कौशल्य प्राप्त होत असतात. मनोरंजन क्षेत्रात निर्माण होणाऱ्या विविधांगी संधींची ओळख करून देण्यासाठी महाविद्यालयातील फिल्म क्लबने ‘वेबसिरीज निर्मिती व व्यवसाय संधी’ या कार्यशाळेचे आयोजन दि. १४ व १५ जानेवारी रोजी केले आहे.
‘दि ब्रोकन न्यूज’ आणि ‘आरण्यक’ सारख्या प्रसिद्ध वेब सिरीजचे दिग्दर्शक श्री. विनय वायकुळ दि. १४ जानेवारी आणि १५ जानेवारी रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील फिल्म क्लबच्या माध्यमातून होणाऱ्या वेबसिरीज निर्मिती व व्यवसाय संधी या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. विनय वायकुळ यांनी थ्री इडियट्स, स्वदेश, भाग मिल्खा भाग, गजनी, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., बस एक पल, शिखर या सिनेमांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आरण्यक या वेबसिरीजसाठी उत्कृष्ट दिग्दर्शक सन्मान विजेतेपद त्यांना प्राप्त झाले आहे. यात सहभागी होण्यासाठी रु. १०० इतके नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
इच्छुक विद्यार्थांनी व या क्षेत्रात कार्यरत होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी समन्वयक डॉ. निधी पटवर्धन ९४२१४३९६६४ किंवा प्रा. सचिन सनगरे ८७९३४५०३२८ यांच्याकडे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सकाळी ११ ते १ या वेळेत आपली नावे नोंदवावीत.